breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

अकरावेळा आमदार असलेल्या गणपतराव देशमुखांनी मुलाला डावलले, कार्यकर्त्यांला दिली शेकापची उमेदवारी

सांगोल्यातून गणपतराव देशमुखाचे वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी जाहीर

आमदार गणपतराव देशमुख यांच्या उपस्थितीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून घोषणा

पुणे |महाईन्यूज |विकास शिंदे|

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यांचा खरा वारसदार म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडून भाऊसाहेब रुपनर यांची आज (रविवारी) उमेदवारीची घोषणा सरचिटणीस जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार गणपतराव देशमुख, आमदार मिनाक्षी पाटील, सुतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, युवा नेते चंद्रकांत देशमुख, अॅड सचिन देशमुख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

253 सांगोला विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 55 वर्ष विधानसभेचा प्रतिनिधीत्व करणारे आमदार गणपतराव देशमुख यांनी वाढते वय अन्ं प्रकृती अस्वस्थामुळे विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली. यामुळे त्याच्या विचाराचा आणि तत्वाशी बांधिल असणा-या वारसदार कोण? याचा शोध सुरु आहे. यातच राजू शेट्टी, भाऊसाहेब रुपनर, चंद्रकांत देशमुख, नानासाहेब लिगाडे, सचिन देशमुखासह अनेकांची नावे चर्चेत आली होती. शेकापच्या उमेदवारीबाबत कमिटी स्थापन करुन त्यात देशमुखाचा वसा आणि वारसा चालविणा-याचा उमेदवारी द्यावी, असं ठरलं होते.

त्यानूसार शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगोल्यात फॅबटेक उद्योग समुहाचे भाऊसाहेब रुपनर यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत सांगोल्यातून शेकापचाच आमदार निवडून यावा, अशी गणपतराव देशमुख यांची इच्छा आहे. याकरिता नव्या नेतृत्व म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या खांद्यावर धूरा सोपविण्यात आली आहे.

दुष्काळी म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. या विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून शेकापचे गणपतराव देशमुख हे ५५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. १९७२ आणि १९९५ ची निवडणूक वगळता ते सलग निवडून येत आहेत. १९७२ मध्ये कै. काकासाहेब साळुंखे-पाटील आणि १९९५ साली काॅंग्रेसकडून शहाजीबापू पाटील निवडून आले होते. तर १९७२ मधील पोटनिवडणूकीत पुन्हा गणपतराव देशमुख निवडून आले होते. सर्वाधिक काळ आमदार म्हणून राहण्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. आता देशमुख हे ९४ वर्षांचे असून त्याचे शरीर देखील साथ देत नसून ऐकण्यासही कमी येत आहे. तरीही देशमुख यांनीही आजपर्यंत सर्वसामान्य वर्गाचे नेतृत्व करुन जनतेच्या मनावर अधिराज्य केलं.

चंद्रकांतदादा देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष

2014 मध्ये देखील आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वस्थामुळे नव्या नेतृत्वाकडे धूरा सोपविणार असल्याचं जाहीर केले होते. त्यानंतर चंद्रकांत देशमुख, भाऊसाहेब रुपनर, नानासाहेब लिगाडे यासह अनेकांची नावे चर्चेत आली होती. त्यावेळेस देखील भाऊसाहेब रुपनर यांचे नाव आघाडीवर होते. परंतू, चंद्रकांत देशमुख हे नाराज होवून काॅंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. 2014 च्या निवडणूकीत देखील आमदार देशमुख यांनी माघार घेतली होती. परंतू, त्यावेळी कार्यकर्त्यांच्या दबावापोटी आमदार देशमुख यांनाच लढावे लागले होते. चंद्रकांतदादा देशमुख हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्थी बॅंकेचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. तसेच पणन महामंडळाच्या संचालक म्हणून कार्यरत होते. पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्रपणे सांगोल्यात जनसंपर्क ठेवला होता. आता चंद्रकांत देशमुख हे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button