breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘दंगली घडवणा-यांना बुध्द समजणार नाही’, सुजात आंबेडकर यांची संभाजी भिडेंवर टिका

मुंबई, महाईन्यूज 

जगाच्या सुखासाठी बुद्ध उपयोगाचा नाही, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी खरमरीत टीका केली आहे. संभाजी भिडे ही दंगली घडवणारी व्यक्ती आहे. त्यांना बुद्ध कदापी समजणार नाही. भारतीय लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी टिका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी आणि संघाचे नेते भारतात स्वत:ला नथुराम गोडसेचे समर्थक म्हणवून घेतात. विदेशात गेल्यानंतर त्यांना बुद्धाची आठवण येते, असेही सुजात यांनी म्हटले आहे. 

रविवारी सांगलीत शिवप्रतिष्ठान संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्यावेळी संभाजी भिडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी भारताने जगाला बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करू शकतो. ते आपलं काम आहे. भारताने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच हवे असल्याचे यावेळी भिडे यांनी सांगितले. 

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. आचारसंहिता लागू झाली असताना संभाजी भिडे अशाप्रकारची विधाने करतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button