breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बारामतीच्या धनगर समाजाचा अजित पवारांना पाठिंबा

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील नेत्यांची बारामतीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. भाजपचे बारामतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचाही या बैठकीत विरोध करण्यात आला. त्यामुळे बारामतीतल्या धनगर समाजाने राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

बारामतीतल्या अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पुणे जिल्हा बँकेचे संचालक मदन देवकाते, दत्तात्रय येळे, संजय देवकाते, रमेश गोफणे, दूध संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव देवकाते यांच्यासह धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाचे धनगर नेते बैठकीला अनुपस्थित होते.

लोकसभेला राष्ट्रवादीचं वर्चस्व

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बारामतीत तळ ठोकत पवारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपाध्यक्ष अमित शाहांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेत रान पेटवलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना दगाफटका बसतो की काय अशी चिन्ह दिसत असतानाच 2014 च्या तुलनेत तब्बल दीड लाखांचं मताधिक्य मिळवत सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button