breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बापरे! सलमान खानला संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी; शार्प शूटरची कबुली

मेरठ | महाईन्यूज

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊन्टरमध्ये अटक झालेल्या शक्ती नायडू गँगच्या शार्प शूटरने खळबळजणक खुलासा केला आहे. सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला मारण्यासाठी 30 लाखांची सुपारी घेतल्याची कबुली रवी भूरा याने पोलिसांना चौकशीवेळी दिलेली आहे. जानेवारी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात हजर झालेल्या सलमानला संपविण्यात येणार होते, असा धक्कादयक खुलासा करण्यात आलेला आहे.

मागिल आठवड्यात कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिव शक्ती नायडूला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. मात्र, त्याचा साथीदार रवी मलिक उर्फ भूरा तेथून निसटला होता. रवी हा मुझफ्फरनगरच्या रायशी येथील राहणारा आहे. मात्र, तो दिल्लीमध्ये स्थायिक झाला होता. शुक्रवारी तो पुष्प विहारमध्ये असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलिसांनी घेराव घालताच तो रेल्वे रोडच्या दिशेने पळून जाऊ लागला. तसेच पोलिसांवर त्याच्या माणसांनी गोळीबार केला असता, प्रत्युत्तरात रवीच्या पायाला गोळी लागली. मात्र, त्याच्यासोबतचे साथीदार पिंटू बंगाली आणि नितीन सैदपुरिया पळून गेले. रवी जखमी झाल्याने पोलिसांच्या हाती लागला होता.

पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते. यानंतरचा खुलासा सलमान खानची आणि त्याच्या शेराची झोप उडविणारा आहे. रवीने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरासोबत मिळून सलमान खानला कायमचे संपविण्याची सुपारी घेतली होती. हे केवळ तो 30 लाखांत करणार होता. 5 जानेवारी 2018 मध्ये काळवीट प्रकरणात सलमान खान न्यायालयात हजर राहणार होता. तेव्हा सलमानला मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिली होती. आता रवीच्या दाव्यामुळे याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पुलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button