breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

बापरे! रशियाकडे जगातील सर्वात वेगवान पहिली हायपरसोनिक मिसाईल; वेग 33000 किमी प्रति तास

महाईन्यूज |

रशियाने आज आवाजाच्या वेगापेक्षा 27 पटींनी जास्त वेगवान असलेल्या हायपरसोनिक मिसाईलला त्यांच्या सैन्दलाकडे सुपूर्द केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी याची घोषणा केली आहे. ही मिसाईल अण्वस्त्र क्षमता ठेवते. या हायपरसोनिक मिसाईलचा वेगच एवढा प्रचंड आहे की त्याच्याशी कोणतीच डिफेन्स प्रणाली टक्कर देऊ शकत नाही. 27 डिसेंबरला ही मिसाईल रशियन सैन्याला देण्यात आली आहे. या मिसाईलची तैनाती कुठे असेल याबाबत कोणतीही माहिती नसून यूरलच्या डोंगररांगांमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते आहे.

हायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी ५ पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग असणार आहे. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत. हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत. या मिसाईलच्या वेगामुळे अमेरिकेसह चीनलाही धडकी भरलेली आहे. अमेरिकेच्या पेटागॉननुसार ते हाय़परसोनिक मिसाईलवर काम करत आहेत. तर चीनने हायपरसोनिक हत्याराचे 2014 मध्येच टेस्टिंग केले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button