breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समिती सदस्य निवड; भाजप फुटीच्या उंबरवठ्यावर?

भाजपमधून 20 नगरसेवक पदापासून वंचित; कारभा-यांकडून स्थानिक नगरसेवकांना डावलेल्याचा आरोप

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सदस्य निवड यंदा भारतीय जनता पार्टीच्या अडचणीची ठरणार असल्याचे दिसत आहे. महापालिकेत भाजप सत्ता येवून तीन वर्ष लोटली, तरीही 20 नगरसेवकांचे कोणत्याच पदावर संधी न देवून पुनर्वसन केलेले नाही. त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून कारभा-यांवरील संतापामुळे ते कधी पक्ष सोडून जातील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आगामी 2022 महापालिका निवडणुकीत निश्चित त्याचा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरु आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या एकूण 16 पैकी आठ सदस्यांची मुदत 29 फेब्रुवारी संपणार आहे. त्यात भाजप सहा आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य बाहेर पडणार आहे. येत्या 26 फेब्रुवारीच्या महासभेत दोन्ही पक्षाकडून आठ सदस्यांच्या निवड जाहीर होणार आहे. त्यात आपलीच निवड व्हावी, म्हणून नगरसेवकांकडून जोरदार फिल्डींग लावली आहे.

सध्यस्थितीत महापालिकेतील ताैलनिक संख्याबळानुसार भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक असे स्थायी समितीत सदस्य नियुक्त झाले आहेत. पहिल्यावर्षी नगरसेवकांना ‘चिठ्ठीद्वारे’ त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी मिळतो. त्यामुळे भाजपकडून स्थायीचे सभापती विलास मडिगेरी, माजी सभापती ममता गायकवाड, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर हे सदस्य बाहेर पडणार आहे.

भाजपच्या प्रदेश पातळीवरुन स्थायी सदस्यांच्या नावाची यादी तयार होवून आली. त्यातील दोन नावांना स्थानिक दोन्ही कारभा-यानी विरोध दर्शविल्याने महासभा तहकुबी केली. तर राष्ट्रवादीकडून दोन जागेसाठी 24 जण इच्छुक असून आपलीच वर्णी लावण्यात यावी, याकरिता इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. महापालिकेच्या येत्या 26 फेब्रुवारीच्या महासभेत स्थायी सदस्यांची निवड होणार असून सत्ताधारी व विरोधकांकडून कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

महापालिकेत सत्ता असूनही भाजपच्या कारभा-याकडून ‘वंचित’

सलग पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता उलथवून पहिल्यादांच भाजप सत्तेत आली. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे हे शहराचे कारभारी बनले. त्यांनी गेल्या तीन वर्षात आपल्या समर्थकांना विविध समित्यांच्या पदावर संधी दिल्या. परंतू, काहींना खड्यासारखे बाजूला ठेवत विविध पदापासून आजही वंचित ठेवले आहे. त्यात स्थानिक नगरसेवकांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांकडून नाराजी सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सत्तेत अजित पवार हे स्थानिक व बाहेरील नगरसेवकांचा समतोल साधून सर्वांना समसमान न्याय देत असल्याची भावना भाजपचे नगरसेवक बोलून दाखवित आहेत. त्यामुळे यंदा स्थायी समिती सदस्य निवडीवरुन निश्चित नाराजीची संख्या वाढून तेच कारण पक्ष फुटीला कारणीभूत ठरणार आहे.

भाजपमधून आम्हाला न्याय कधी मिळेल?

भाजप नगरसेविका हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, प्रियंका बारसे, सारिका लांडगे, जयश्री गावडे, माया बारणे, निता पाडाळे, सविता खुळे, चंदा लोखंडे तर नगरसेवक वसंत बोराटे, रवि लांडगे, नितीन लांडगे, सुरेश भोईर, शैलश मोरे, संदीप वाघेरे, अभिषेक बारणे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, संतोष कांबळे, तुषार कामठे हे सर्वजण नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button