breaking-newsराष्ट्रिय

यूपीएससीच्या परीक्षांचं वर्षभराचं कॅलेंडर जारी

नवी दिल्ली : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात यूपीएससीचं 2021 चं वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व परीक्षांचं शेड्युल यूपीएससीच्या upsc.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बदल यामध्ये करण्यात आले आहेत, तर काही नवीन गोष्टीही करण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती यूपीएससीच्या वेबसाईटवर मिळणार आहे.

यूपीएससीमधील सर्वात महत्त्वाची सिव्हिल सर्विस परीक्षा 27 जून 2021 ला निश्चित करण्यात आली आहे. साधारणत: ही परीक्षा मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला होत असते. यावर्षीची पूर्व परीक्षाही मे महिन्यात होणार होती ती लांबणीवर पडली असून ती आता 4 ऑक्टोबरला होणार आहे.

परीक्षेचं नावनोटिफिकेशनची तारीखअर्ज करण्याची अंतिम मुदतपरीक्षेची तारीख
कंबाइंड जियो-साइंटिस्ट प्री परीक्षा 202107.10.202027.10.202021.02.2021
सीडीएस परीक्षा (I) 202128.10.202017.11.202007.02.2021
एनडीए आणि एनए परीक्षा (I) 202130.12.202019.01.202118.04.2021
सिव्हिल सर्विसेस प्री परीक्षा 2021, इंडियन फॉरेस्ट सर्विस प्री परीक्षा 202110.02.202102.03.202127.06.2021
इंजीनियरिंग सर्विसेस प्री परीक्षा 202107.04.202127.04.202118.07.2021
सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस एग्जाम 202115.04.202105.05.202108.08.2021
कंबाइंड मेडिकल सर्विसेस एग्जाम 202105.05.202125.05.202129.08.2021
एनडीए आणि एनए परीक्षा (II) 202109.06.202129.06.202105.09.2021
सिव्हिल सर्विसेस मुख्य परीक्षा 202117.09.2021
सीडीएस परीक्षा (II) 202104.08.202124.08.202114.11.2021
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button