breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बहुमूल्य धैर्यवान मित्र गमावला’; राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांना आमदार लक्ष्मण जगताप यांची श्रद्धांजली

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराची शनिवारची सकाळ मन्न सुन्न करणाऱ्या घटनेने झाली. माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी आली आणि धक्काच बसला. सर्वपक्षीयांसोबत मैत्री असणारा हा दिलदार मित्र आज अचानक सर्वांना सोडून निघून गेला. दत्ताकाका हे सर्वार्थाने राजकीय पुढारी असले तरी नागरिकांना मदत करणारा, मदतीसाठी कधीही धाऊन जाणारा खुशखुशीत वक्ता, प्रवाहाविरोधात पोहणारा, चुकीचे असेल तिथे प्रसंगी पक्षाविरोधात जाऊन सुद्धा बोलणारा अशी त्यांची चतुरस्त्र ओळख होती. असा हा बहुमूल्य मित्र मी गमवाला आहे, अशा शब्दांत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दत्ताकाका साने यांना श्रद्धांजली वाहिली.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “काहींना जन्मतःच समृद्ध जीवनाचा वारसा मिळतो, तर काही जण आपले जीवन स्वतः घडवतात. दत्ताकाका साने म्हणजे स्वकतृत्वाने घडलेला माणूस. त्याने २५ वर्षापूर्वी राजकारणात पाय ठेवला. दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्यापासून दत्ताकाका माझ्यासोबत होता. धडाडीचा उमदा आणि अभ्यासू दत्ताकाका मी जवळून अनुभवला आहे. माझे दुःख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

एक राजकीय नेता म्हणून दत्ताकाका यांनी पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वाचे योगदान दिले. दत्ताकाका हे चिखली भागातील किंगमेकर होते. राजकारणात जनतेच्या समस्यांची जाणीव अचूक असावी लागते. ती दत्ताकाका यांच्याकडे होती. ते प्रत्येक निवडणूक सहजपणे जिंकायचे. दिलदार स्वभावामुळे दत्ताकाकांनी अनेक मित्र जोडले होते. समाजातील सर्व घटकांना ते आपलेसे वाटत होते. कोणतेही काम तो तितक्याच ताकदीने करत होता.

दत्ताकाकांची राजकीय वाटचाल सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी आहे. कोणत्याही माणसाशी सहज मैत्री करणारा व आत्मभान असणारा एक बहुमूल्य धैर्यवान मित्र मी गमावला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या संघर्षात सुद्धा त्यांनी मैत्रीला बाधा येऊ दिली नाही. त्यांची आंतरदृष्टी आणि सूक्ष्म आकलनशक्ती उल्लेखनीय होती. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला चांगले दिवस आले असताना काळाने अशा पद्धतीने दत्ताकाकांना ओढून घेणे मनाला पटणारे नाही. त्यांचे निधन खूपच दुःखद आहे. त्यांच्या जाण्यामुळे पिंपरी-चिंचवडचा अभ्यास असणारा नेता हरवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button