breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

“आईचा पदर, तर आईचा पदरच असतो”…अमिताभ बच्चन झाले भावूक…

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या जीवनातील अनेक घडामोडी ते ट्विटर किंवा फेसबुकद्वारे शेअर करत असतात. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या आईबद्दल एक भावूक पोस्ट लिहिली आहे. डोळ्याला झालेल्या त्रासानंतर आलेली आईची आठवण त्यांनी सोशल मीडियावर एका भावूक पोस्टद्वारे शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्रास होणाऱ्या डाव्या डोळ्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि त्यासोबत,
‘डावा डोळा फडफडत होता, लहानपणी ऐकलं होतं की हे अशुभ असतं.
त्यामुळे डॉक्टरांना दाखवायला गेलो, तर डोळ्यात एक काळा ठिपका दिसला.
डॉक्टर म्हणाले…काही नाही वयामुळे झालं आहे…लहानपणी आई पदराचा बोळा करुन, फुंक मारुन, डोळ्याला शेक द्यायची तसं करा, सर्वकाही ठिक होईल.
पण आता आई तर नाहीये…वीजेद्वारे रुमाल गरम करुन शेक घेत आहे.
मात्र त्याचा काही उपयोग नाही
आईचा पदर, तर आईचा पदरच असतो…त्याला दुसऱ्या कशाची सर नाही’ अशा आशयाची पोस्ट केली.

या पोस्टमुळे अमिताभ बच्चन यांना त्यांची आई तेजी बच्चन यांची आठवण येत असल्याचं स्पष्ट होतंय. त्यांची ही पोस्ट नेटकऱ्यांच्याही पसंतीस पडली असून अनेक नेटक-यांनी याबाबत भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button