breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहुजन समाजाच्या नेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला या प्रकरणावरुन खुप त्रास झाला – अजित पवार

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी कोरोना लसीकरण, सीरमची आग, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरण, राजकारण्यांचे पक्षप्रवेश अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणावर बोलण्यासाठी विशेष वेळ घेतलेला पाहायला मिळाला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्याबाबत अजित पवार खुप बोलले आहेत.

वाचा :-धनंजय मुंडेंवर खोटे आरोप लावणार्‍या महिलेवर IPC-192 अंतर्गत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी: भाजप नेत्या चित्रा वाघ

“याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आहे. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली. असे आरोप करणारे काही तथ्य समोर आले नाही. अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा. आज माझे धनंजयसोबत बोलणं झाले नाही. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करु नये, असं अजित पवारांनी नमूद केलं.

एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करु लागला, तर त्याचं नाव लोकांत चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावं लागतं. असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलनं करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी ही मागणी केली, धनंजयसंबंधात वक्तव्य केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

धनंजयला राष्ट्रवादीने संधी दिली, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. संधीचं सोनं केलं. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताने निवडून आले. पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांचा त्यांनी पराभव केला. पवारांनी महत्त्वाच्या खात्याचा भार दिला. ते काम करत होते. बहुजन समाजातून आलेला नेता. त्यांच्या मागे कुटुंब अक्षरश: पाच सहा दिवस अडचणीत आले. डिस्टर्ब झाले. याला कुणी वाली आहे की नाही. मुंडे कुटुंबाला ७-८ दिवस भयंकर त्रास सहन करावा लागला. राष्ट्रवादीला प्रश्न विचारले, राजीनाम्याची मागणी केली. मात्र शरद पवारांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊ द्या असं आधीच सांगितलं होतं, असं अजित पवारांनी नमूद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button