breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अटकपूर्व जामीनासाठी नियमित न्यायालयाकडे दाद मागा

  • डोक्‍यात विट घालणाऱ्या युवकाला हायकोर्टाने फटकारले 

मुंबई – दुकानाच्या गाळ्यासमोर गाडी लावल्याच्या वादातून एका युवकाचा डोक्‍यावर विट मारून गंभीर जखमी करणे पुण्यातील वीस वर्षीय प्रसन्ना डांगेला चांगलेच महागाईत पडले आहे. या विटेच्या फटकारण्याने गंभीर दुखापत झाल्याने अटकेची शक्‍यता निर्माण झाल्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन पदरात निराशा पदरी पडली आहे. उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी अटकपूर्वी जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देऊन नियमित न्यायालयासमोर 4 जूनला दाद मागण्याचे निर्देश दिले.

पुणे येथील वाकट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानासमोर गाडी लावल्याने आरोपी आणि एका तरूणाचा वाद झाला. या वादात आरोपी प्रसन्ना डांगे याने 24 एप्रिलला रागाच्या भरात एका युवकाच्या डोक्‍यावर विट मारली. त्यात तो गंभर जखमी झाला. या प्रकरणी वाकट पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने अटकेच्या शक्‍यता निर्माण झाल्याने आरोपी प्रसन्ना डांगे याच्यावतीने ऍड. अनिकेत निकम यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका आज ऍड. निकम यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिली. न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी न घेता नियमित न्यायालयासमोर 4 जूनला दाद मागण्याचे निर्देश दिले.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button