breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या
करोना विषाणूंचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. दिवसाला हजारो रुग्णांना संसर्ग होत असून अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांच्या नजरा सध्या करोना लशीकडे लागल्या आहेत. भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू असून, अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन निर्माण केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. दुसरीकडे जॉन्सन अँड जॉन्सन आता याच लशीच्या लहान मुलांवरही चाचण्या करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.