breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बहिणीच्या पतीची हत्या करणा-या बालाजी लांडगेला अटक
बीड : प्रेमविवाह केला म्हणून बहिणीच्याच पतीची हत्या करणारा मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पोलिसांनी आज अमरावतीत पहाटे बेड्या ठोकल्या. दोन दिवसापूर्वी इतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
सुमित वाघमारे याने बालाजी लांडगेच्या बहिणीशी २ महिन्यापूर्वी विवाह केला होता. हा विवाह बालाजीच्या मनाविरुद्ध झाला होता, हा राग मनात धरून बालाजीने भर रस्त्यात बालाजी लांडगे व संकेत वाघने १९ डिसेंबरला सुमित वाघमारेचा खून केला होता.
या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. एवढेच नाही तर बीड पोलिसांवर देखील मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी पहाटे बीड पोलिसांनी सापळा रचून बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.