breaking-newsताज्या घडामोडी

बापरे! बुलेट गिफ्ट, अनेकवेळा पैसेही उकळले, 47 वर्षीय महिलेची लग्नाच्या आमिषाने फसवणूक

नाशिक : गिफ्ट म्हणून बुलेट आणि अनेकवेळा पैसे देऊनही एका 47 वर्षीय महिलेची फसवणूक झाल्याची घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केली आहे. आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिला नाशिक शहरातील कामटवाडे भागात राहत आहे. आरोपीने या 47 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचारही केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन अंबड पोलिसांत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्य करतो आहे. या संशयित आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत हे कृत्य केलं आहे.

पीडित महिला आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मैत्री होती. या मैत्रीतूनच आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केला. आरोपीने वारंवार लग्नासाठी महिलेकडून पैशांची मागणी केली आहे. लग्नाच्या अपेक्षेने पीडित महिलेने देखील आरोपीला बुलेट मोटार सायकल आणि रोख रक्कम दिली. मात्र, यानंतरही आरोपीने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडित महिलेने आरोपीला जाब विचारला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवल्याची माहिती अंबडचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांनी दिली. अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button