breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या सुरक्षेकडे मेट्रोचे दुर्लक्ष ; बेजबाबदार अधिका-यावर कारवाई करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – कासारवाडी येथील मेट्रो पिलरचे खड्डे खोदणारे ड्रिलिंग मशीन कोसळल्याची घटना आज (शनिवारी) घडली. पिंपरी-चिंचवड शहरावर मेट्रोच्या कामामुळे अनेक संकटे येवू लागली आहेत. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता, महामेट्रो प्रकल्पाकडून दुर्लक्ष होत आहे. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने खासगी बससह अनेक वाहन चालक सुखरुप बचावले आहेत. मेट्रोच्या बेजबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. यावेळी नगरसेवक शाम लांडे, राजू बनसोडे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते. 

सदरील मेट्रोच्या पडलेल्या ड्रिलिंग मशीनची विरोधी पक्षनेते साने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी साने म्हणाले की, ” पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोकडून बेजबाबदारपणे मेट्रोचे काम केले जात आहे. सुरक्षितेची कोणतीही दक्षता घेतली जात नाही. मेट्रोकडून कामाची माहिती देखील दिली जात नाही. सत्ताधा-यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. यापुढे महामेट्रोने सुरक्षिततेची काळजी घेऊन काम करावे. दिवसा काम करू नये. रात्रीचे काम करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. दिवसा काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस काम बंद पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

त्या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी. महामेट्रो, महापालिकेच्या जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी. ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी अथवा काळ्या यादीत टाकावे. महामेट्रोची एवढी मोठी दुर्घटना घडली असताना सत्ताधारी पक्षातील एकही पदाधिकारी तिकडे फिरकला नाही. त्यांना जनतेचे काही घेणेदेणे राहिले नाही, असा आरोपही साने यांनी केला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”महामेट्रोची घडलेली घटना दुर्देवी आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. यापुढे महामेट्रोने जबाबदारी सांभाळून काम करावे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुदतीत काम पूर्ण करावे. तसेच घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिका-यांकडून मी माहिती घेतली होती. घटनास्थळी जावून पाहणी करणार आहे. चौकशीची आवश्यकता असल्यास चौकशी देखील केली जाईल”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button