breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बसमधून पडून महिलेचा मृत्यू; चालकास अटक

पुणे – पीएमपीएल बसमधून प्रवास करणारी महिला बसस्टॉपला उतरत असताना बसचालकाने बस हलविल्याने तोल जाऊन महिला खाली पडली. त्यानंतर बसचे चाक डोक्यावरुन गेल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता हडपसर येथे घडली.

शालन सुरेश घुले (वय 59, रा. बेलहेकर वस्ती, मांजरी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक राजू पवार (वय 28, रा.हडपसर) यास हडपसर पोलिसांनी अटक केली.

घुले या पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बेलहेकर वस्ती येथे आल्यानंतर त्या बसमधुन उतरत होत्या. त्याचवेळी बसचालकाने बस हलविली. त्यामुळे तोल गेल्याने घुले खाली पडल्या. त्याचवेळी बसचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा मृत्यु झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button