breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारणराष्ट्रिय

‘बये दार उघड मोहीम’चे पुण्यात आगमन, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेऊन आज ‘बये दार उघड मोहीम’ पुणे शहरातील तांबडी जोगेश्वरी, भवानी माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, या सूप्रसिद्ध देवीच्या मंदिरांमध्ये वाजत गाजत पोहोचली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने ही मोहीम नवरात्रानिमित्त राज्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुरू केली आहे.

युवा नेते आदित्य ठाकरे यांचे पुणे शहरांमध्ये नवरात्र निमित्त नुकतेच आगमन झाले असून यानिमित्ताने या मोहिमेला महिलांचा वाढता प्रतिसाद आहे. या मोहिमेच्या निमित्ताने पुणे शहरातील आणि ग्रामीण भागातही या मोहिमेची सर्वत्र चर्चा आहे. शिवसेनेचा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून सामान्य जनतेशी या निमित्ताने होणारा संवाद अधिक प्रभावी ठरत आहे. आज तांबडी जोगेश्वरी, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथे शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, युवासेना पदाधिकारी शीतल शेठ, पुणे शहर महिला आघाडीच्या सविता मते, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, अमृत पठारे, अश्विनी शिंदे,अनिता परदेशी, करुणा घाडगे, कल्पना थोरवे,प्रज्ञा लोणकर, शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, नगरसेवक विशाल धनवडे, उपशहर संघटक राजेंद्र शिंदे, आनंद गोयल, प्रशांत राणे, संजय वाल्हेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button