breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बनावट कागदपत्रांद्वारे पिंपळे गुरवला बळकावली जागा, दोघांवर गुन्हा दाखल

  • महापालिकेच्या अधिका-यांविरोधात कोर्टात तक्रार

पिंपरी – पिंपळे गुरव येथील जागेचे बनावट कागदपत्र बनवून हाडप केली आहे. त्या जागेबाबत फसवणूक झाल्याने दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अतुल दिलीप काशिद (वय 34, रा. काशिदवस्ती, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार विनायक किशोर गारवे (रा. विनायक नगर, नवी सांगवी) आणि अरूण श्रीपती पवार (रा. शहीद भगतसिंग चौक, पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात माजी नगरसेविका सावित्री गारवे यांचा विनायक हा मुलगा आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्‍टोबर 2013 ते 16 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली. आरोपींनी आपआपसांत संगनमत करून पिंपरी चिंचवड महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली. पिंपळे गुरव येथील फिर्यादी यांच्या जमिनीची कोणतीही वाटणी झालेली नसताना तसेच फिर्यादी यांच्या कुटूंबियांची परवानगी न घेता स्वतःच्या फायद्यासाठी मिळकत विकसित केली. यामुळे फिर्यादी यांची मिळकत विक्री व विकसित करण्यासाठी अडथळा निर्माण होऊन फिर्यादी यांचे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले.

वारसदार प्रकाश काशिद हे सहहिस्सेदार असून त्यांच्याकडून गारवे व पवार यांनी कोणतेही मालकी हक्‍क न घेतले नाही. वारसदार प्रभाकर काशिद हे मयत असतानाही त्यांच्या नावे मोजणी अर्ज केला. मोजणीचे बनावट कागदपत्रे महापालिकेच्या नगर रचना आणि बांधकाम परवाना विभागात सादर करून बांधकाम परवाना मिळविला. यामुळे शासनाची तसेच फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे अतुल काशिद यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग करीत आहेत.

आयुक्तांसह बांधकामच्या अधिका-यांवर तक्रार

पिंपळे गुरव येथील जागेच्या बनावट कागदपत्राद्वारे जागा बळकावून हाडप केल्याने फसवणूक झाली. त्यात दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्याच कागदपत्राद्वारे पिंपरीतील भूमिअभिलेक कार्यालयाचे अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या विरोधात कोर्टात 156 कलमान्वये फैजदारी कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केल्याचे अतुल काशिद यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button