breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार सुजय विखेंना धक्का, शेतकऱ्यांच्या मुलांनी विखेंना पाठवला २ हजारांचा चेक

अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले २ हजार रुपये शेतकऱ्यांना चालतात, मग भाजपचं कमळ का नको, असं वक्तव्य करणारे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. नगरमधील शेतकऱ्यांच्या मुलांनी विखे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना २ हजार रुपयांचा चेक स्पीड पोस्टाद्वारे पाठवला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी सुजय यांनी शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. ‘पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?, तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,’ असं सुजय म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. विखेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काही तरुणांनी त्यांना २ हजार रुपयांचा चेक पाठवला आहे. त्याचबरोबर एक जाहीर निवेदनही काढलं आहे. ‘आम्ही सुजय विखेंना दोन हजार रुपये पाठवत आहोत. त्यांनी लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावं, असं आवाहन या निवेदनातून करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button