breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनरुत्थान समरसता गुरूकुल शाळेत अल्पोपहार वाटप

संदीप शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीचा उपक्रम  

पिंपरी | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरूकुल शाळेत अल्पोपहार वाटप करण्यात आले. चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संदीप यशवंत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवारातर्फे अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. या ठिकाणी असणार्या आदिवासी, अनाथ विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. तसेच दरवर्षी नवीन सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला.  

या कार्यक्रमासाठी संदीप शिंदे, मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली पुणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र फुलपगारे, माहिती अधिकार कार्यकर्ते राम परदेशी, सामाजिक कार्यकर्ते विनोद कासार, देविदास काताळे, अजय जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button