breaking-newsआंतरराष्टीय

मेक्‍सिकोत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची मायदेशी रवानगी

नवी दिल्ली : मेक्‍सिकोमध्ये अवैधरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली 311 भारतीयांची मेक्‍सिकन सरकारने मायदेशी रवानगी केली आहे. मेक्‍सिकोने सर्व भारतीयांना दिल्लीला पाठवले असून आज सकाळी बोइंग 747-400 चार्टर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले असल्याचे सांगण्यात येत आहे. मेक्‍सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिटूजने याबाबतची माहिती दिली आहे.

भारतात परत पाठवलेल्या लोकांकडे आवश्‍यक ती कागदपत्रे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मेक्‍सिकोने परत पाठवलेले भारतीय 60 फेडरल मायग्रेशन एजंटच्या मदतीने तिथे पोहचले होते. चौकशीत त्यांच्याकडे कागदपत्रेही नसल्याचे समोर आले. वास्तव्यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे जवळ नसतानाही संबंधित लोक गेल्या काही महिन्यांपासून तिथे होते. भारतात माघारी पाठवण्यात आलेल्या लोकांनी अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी एजंटना 25 ते 30 लाख रुपये दिल्याची धक्कादायक माहितीही सध्या समोर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button