breaking-newsआंतरराष्टीय

बदला घेण्यासाठी केला हल्ला

अन्नापोलिस – अमेरिकेत ऍनापोलिस शहरातील एका वृत्तपत्र कार्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले तर अन्य नाही जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराचे नाव जारोड रामोस असे असून तो 38 वर्षीय आहे. त्याने बदला घेण्यासाठीच या वृत्तपत्रावर हल्ला केला असे सांगण्यात येते. त्याचा या वृत्तपत्रावर राग होता. सन 2011 साली या वृत्तपत्राने त्याच्या विरोधात एक बातमी छापली होती.

त्या प्रकरणात या इसमाने या वृत्तपत्रावर बदनामीचा खटला दाखल केला होता. पण हा खटला तो हरला त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठीच त्याने हा हल्ला केला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. या हल्लेखोराने एका महिलेला सोशल मिडीयावरून तीव्र त्रास दिला होता. त्यावरून त्याच्या विरोधात या वृत्तपत्रातील कॉलम मधून लिखाण करण्यात आल्याने तो बिथरला होता असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तपास यंत्रणांकडून या हल्ल्याची माहिती घेतली. अमेरिकेतील विविध वृत्तपत्रीय संघटनांनी या हल्ल्याचा व पत्रकारांच्या हत्येचा निषेध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button