breaking-newsआंतरराष्टीय

रोहिंग्यांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी गुटेर्रेस बांगलादेशला जाणार

संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस हे पुढच्या आठवठ्यात बांगला देशला भेट देणार असून तेथे, ते रोहिंग्य मुस्लिमांच्या छावण्यांना भेट देऊन त्यांच्या स्थितीची माहिती घेणार आहेत. सुमारे सहा लाख रोहिंग्य मुस्लिम सध्या बांगलादेशातील निर्वासितांच्या छावणीत राहात असून त्यांना मायदेशी परतता यावे यासाठी संयुक्तराष्ट्रांकडून प्रयत्न सुरू आहेत. याच्या प्रगतीचाही ते यावेळी आढावा घेणार आहेत. जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम हेही त्यांच्यासमवेत असणार आहेत.

येत्या 1 जुलै रोजी ते तेथे जाणार आहेत. संयुक्तराष्ट्रांच्या निर्वासितांसाठी काम करणाऱ्या विभागाचे उच्चायुक्त फिलिप्पो ग्रॅन्डी आणि लोकसंख्या नियंत्रण निधी विभागाचे कार्यकारी संचालक नतालिया कानेम याही त्यांच्यासमवेत असणार आहेत.

या रोहिंग्यांचे आपल्या देशात सन्मानाने पुनर्वसन व्हावे यासाठी आतंरराष्टीय स्तरावरून प्रयत्न केल जात आहेत. त्यासाठी म्यानमार आणि बांगलादेश प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही हे निर्वासित बांगलादेशात येण्याच प्रमाण थांबलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button