breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

नितीन गडकरींनी केली नवीन तंत्रज्ञानाची घोषणा; ट्रक, बस किंवा कार दरीत कोसळण्यापूर्वीच थांबणार

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत हायवेवरील ट्रक, बस आणि कारच्या अपघातांवर एका नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. राज्यसभेतील स्वीकृत सदस्य गुलाम अली यांनी एक प्रश्न विचारला होता. यावर गडकरींनी हे उत्तर दिले आहे. तसेच दुर्गम भागांत सरकार या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करत असल्याचे म्हटले आहे.

काश्मीरमध्ये हायवेंवर ट्रक अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. रस्त्यांवर क्रॅश बॅरिअर असतात परंतू ट्रकचे वजन एवढे असते की जर तो ट्रक घसरून खाली कोसळतो, आजुबाजुला हायड्रो प्रोजेक्ट असल्याने तो ट्रक तर सापडत नाही पण मृतदेहही सापडत नाहीत. यामुळे डोड्डा ते किश्तवाड आणि उधमपूर ते श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाती क्रॅश बॅरिअर्स बसवल्यास अपघात थोडे कमी होऊ शकतात, अशी मागणी अली यांनी केली.

हेही वाचा – अरबी समुद्रात हालचालींना वेग, राज्यात पुढील ३ दिवस पाऊसाचा इशारा

यावर गडकरी यांनी उत्तर दिले. पूर्वी क्रॅश बॅरिअर्स लोखंडाचे असायचे. आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉंक्रिटमध्ये एम्बेड केले जाते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर मागे येतो. या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button