breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बछडय़ाची वाघिणीशी भेट घालून देण्यासाठी वनविभागाची धडपड

जंगलभ्रमंतीदरम्यान अचानक वाघिणीपासून तिचा बछडा विलग झाला. वनविभागाला तो सापडला. या बछडय़ाला आईजवळ सोडण्याचे ठरले. मात्र, याच परिसरात दोन वाघिणी तीन पिल्लांसह आढळून आल्याने बछडय़ांची खरी आई कोणती असा प्रश्न वनविभागासमोर उभा ठाकला. या बछडय़ाच्या खऱ्या आईची ओळख पटविण्यासाठी अखेर  वाघिणीची डीएनए चाचणी करण्यात आली. अशी चाचणी करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या चाचणीतून बछडय़ाच्या खऱ्या आईची ओळख पटली. परंतु आता ती या जंगलात नेमकी आहे कुठे, हे शोधण्याचे मोठे आव्हान विनविभागासमोर असून त्या वाघिणीला शोधण्यासाठी वनकर्मचाऱ्यांची अविरत धडपड सुरू आहे.

मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव जंगलातून हा बछडा त्याच्या आईपासून विलग झाला होता. या वनक्षेत्रात संचार करणाऱ्या दोन वाघिणींचे डीएनए नमुने वन विभागाने हैदराबाद येथील प्रयोग शाळेत पाठविले होते. ४० दिवसानंतर मंगळवारी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यातून टी-२ ही वाघीण त्या बछडय़ाची आई असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेत गठित समितीच्या मार्गदर्शनानुसार बछडय़ाला आईच्या स्वाधीन करण्याची तयारी वन विभागाने सुरू केली आहे.  या बछडय़ाला करोनाची बाधा होऊ नये म्हणून त्याचे नमुनेही तपासण्याचा प्रयत्न झाला होता. या बछडय़ाला एकटयाने जंगलात सोडल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल, या भीतीने त्याच्या आईच्या शोधासाठी वनविभागाची धडपड सुरू आहे. वाघिणीपासून बछडे दुरावण्याच्या घटना साधारणत: तराई लॅन्ड, दक्षिण महाराष्ट्रात घडत असतात. आईची शिकार झाली अथवा काही दुघर्टना घडली तरच असा प्रकार घडू शकतो. ज्या क्षेत्रात एखादी वाघीण असेल त्या क्षेत्रात सहसा दुसरी वाघीण संचार करीत नाही. सुशी-दाबगाव जंगलात मात्र प्रत्येकी तीन बछडे असलेल्या दोन वाघिणी मिळाल्या. त्यामुळे बछडय़ाच्या आईची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागली.

डीएनए चाचणीद्वारे बछडय़ाच्या आईचा शोध लागला आहे. आता जंगलात तिचे नेमके ठिकाण शोधले जात आहे. त्यानंतरच बछडय़ाला सोडण्यात येईल.

-रामाराव, मुख्य वनसंरक्षक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button