breaking-newsक्रिडा

बंगळुरूचा हैदराबादवर 14 धावांनी विजय

बंगळुरू – अखेरच्या दोन षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे बंगळुरूने हैदराबादचा 14 धावांनी पराभव करत बाद फेरीत पोहोचण्याचे आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी बाद 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना हैदराबादचा डाव 20 षटकांत 3 बाद 204 धावांत आटोपला.

Royal Challengers

@RCBTweets

That makes it 3 in 3 games and we have a winning run 🔥❤️

Chahal was outstanding with the ball and AB, Mo, CdG and Sarfaraz all contributed to give our home crowd a fitting farewell 🙌

Now onto Jaipur.

केन विल्यम्सन आणि मनिष पांडे यांच्या फटकेबाजी मुळे हैदराबादने बंगळुरूच्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पहिल्या सहा षटकांत 56 धावा केल्या होत्या. यावेळी सलामीवीर शिखर धवन केवळ 18 धावा करून परतला. धवन परतल्यानंतर ऍलेक्‍स हेल्सने फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र ऍब डिव्हिलिअर्सने उत्कृष्ट झेल टिपत त्याला माघारी धाडले. हेल्सने 24 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर केन विल्यम्सनने मनिश पांडेला सोबतीला घेऊन फटकेबाजी करत हैदराबादच्या धावगतीला वाढवले.

Royal Challengers

@RCBTweets

We’re extremely thrilled to give this fantastic crowd a farewell they deserve!

मात्र 16व्या षटकात साऊदीने केवळ 6 धावा देत सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे हैदराबादला शेवटच्या षटकात विजयासाठे 20 धावांची आवश्‍यकता होती. यावेळी अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर विल्यम्सन बाद झाला त्याने 42 चेंडूत 81 धावांची खेळी केली तर पांडे सोबत 11 षटकात 135 धावांची भागीदारी केली. यावेळी पांडेने नाबाद 62 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

IndianPremierLeague

@IPL

Match 51. It’s all over! Royal Challengers Bangalore won by 14 runs http://bit.ly/IPL2018-51 

तत्पूर्वी, ऍब डीव्हिलिअर्स आणि मोईन अली यांची वेगवान अर्धशतके आणि कॉलिन डी ग्रॅंडहोमच्या समयोचित खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सनरायजर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी 219 धावांचे आव्हान ठेवता आले. नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरू संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 218 धावांची मजल मारली. हैदराबादने सुरुवातीच्या षटकांमध्ये पार्थिव पटेल व विराट कोहलीच्या रुपाने बंगळुरूला दोन हादरे दिले. परंतु ऍब डीव्हिलिअर्स व मोईन अली यांनी 107 धावांची भागीदारी करीत बंगळुरूचा डाव सावरला. डीव्हिलिअर्सने 39 चेंडूंत 69 धावा केल्या. तर मोईनने 34 चेंडूत 65 धावांची वेगवान खेळी केली.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

IndianPremierLeague

@IPL

Phew! A last over thriller and @RCBTweets have beaten @SunRisers by 14 runs iin their final home game this season. They stay alive in the battle for 2 Playoff spots.

रशीद खानने या दोघांनाही एकाच षटकांत बाद केले. मात्र कॉलिन डी ग्रॅंडहोमने 17 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांसह 40 धावा केल्या. तर सर्फराझ खानने (नाबाद 22) खेळी करीत बंगळुरूला 218 धावांची मजल मारून दिली. हैदराबादच्या बेसिल थंपीने 4 षटकांत 70 धावा देताना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम केला.

SunRisers Hyderabad

@SunRisers

5 runs off the final over as we fall short of 14 runs.
It was a good match and we have scored better than all of our scores so far. We will pick upon the gaps and come back stronger for the next matches.-204/3(20.0)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button