breaking-newsराष्ट्रिय

बँक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार ?

नवी दिल्ली : सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या मिळून १० लाख कर्मचाऱ्यांनी मेच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पगारवाढीसंबंधीच्या मागण्या मान्य न झाल्यास ३० व ३१ मे रोजी बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे दिसत आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनाबद्दल ‘इंडियन बँक असोसिएशन’ला चांगला प्रस्ताव देण्यास केंद्र सरकारने बंधनकारक  करावे, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली आहे. ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशन’ने ही माहिती दिली. ‘बँकांच्या मोठ्या प्रमाणातील नफ्याचा वाटा थकीत कर्जांमध्ये रुपांतरित होत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. मोठ्या रकमांची कर्जे निर्लेखित करून बँकांची अवस्था बिकट करण्यात येत आहे. मात्र, बँकांच्या कर्मचाऱ्यांविषयी सरकारची अनास्था दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने हस्तक्षेप करून आयबीएला ऑफर सुधारण्यास सांगावे अन्यथा ४८ तासांचा संप पुकारण्यावर संघटना ठाम आहे,’ अशी माहिती ‘एआयबीए’चे महासचिव सी. एच. वेंकटचलन यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button