breaking-newsराष्ट्रिय

पहिल्या सहा महिन्यात काश्मीरमध्ये १२१ अतिरेक्यांचा खात्मा, ८२ टक्के स्थानिक दहशतवादी

काश्मीर खोऱ्यात लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली आहे. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये १२१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये २१ दहशतवादी पाकिस्तानी होते तर उर्वरित ८२ टक्के दहशतवादी स्थानिक होते. दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक चकमकी झाल्या.

पुलवामामध्ये ३६, शोपियनमध्ये ३४ आणि अनंतनाग जिल्ह्यात १६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. स्थानिकांचे दहशतवादी संघटनांकडे वळण्याचे प्रमाण २०१९ मध्येही कमी झालेले नाही. पहिल्या सहा महिन्यात ७६ स्थानिकांनी बंदूक उचलली. ३९ जणांना हिजबुल मुजाहिद्दीन आणि २१ जणांनी जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी झाले. दक्षिण काश्मीरच्या जिल्ह्यात तरुण मोठया प्रमाणावर दहशतवादी संघटनांमध्ये भरती झाले.

यावर्षी जानेवारी ते जून महिन्यात पुलवामामधून २०, शोपियनमधून १५ तर अनंतनाग आणि कुलगाममधून प्रत्येकी १३ तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. दक्षिण काश्मीरमधील जिल्ह्यांमध्ये दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण जास्त आहे. खोऱ्यातील या दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर गोळीबार, ग्रेनेड हल्ला, आईडीचा स्फोट, पेट्रोल बॉम्ब फेकणे, शस्त्र हिसकावणे आणि अपहरण असे गुन्हे केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button