breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

… तर आमचा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प रद्द करा – नगरसेवक शत्रुघ्न काटे

  • प्रशासनावर आयुक्तांचा नाही वचक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर अनधिकृत होर्डिंग्ज, हाॅकर्स, टपरी, हातगाडीवाले बकाल केले आहे. त्या लोकांवर कारवाई करण्याचे पत्र देवून होत नाही. त्यामुळे सगळे शहर हाॅकर्स झोन जाहीर करा आणि पिंपळे साैदागरचे स्मार्ट सिटीचा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्प मंजुरीसाठी आज (शनिवारी) विशेष महासभेचे आयोजन केले होते. यावेळी महासभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर राहूल जाधव होते. याप्रसंगी ते बोलत होते.

काटे म्हणाले की, पिंपळे साैदागरमध्ये केवळ 20 हाॅकर्स होते. आता त्या टपरी, हातगाडी संख्या 250 हून अधिक झाली आहे. त्या लोकांवर कारवाई कोण करणार? त्या लोकांची दादागिरी वाढू लागली आहे. नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत त्याची मजल चालली आहे. त्यांनी शहराचे बकालीकरण थांबविण्यासाठी हाॅकर्स हटविणे गरजेचे आहे. पिंपळे साैदागरचे हाॅकर्स हटवण्याचे पत्र देवून महिना झाला. पण अजूनही कारवाई झालेली नाही. अधिकारी नीट कामे करीत नाहीत. आयुक्त साहेब तुम्ही केवळ निविदा राबविण्याच्या मागे लागला आहे. त्यामुळे शहराच्या विकासाकडे कोणाचेच लक्ष नाही.

त्यामुळे पिंपळे साैदागरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प रद्द करा, सर्व शहर हाॅकर्स झोन म्हणून जाहीर करा, त्या लोकांवर कारवाई न केल्यास प्रत्येक अधिका-यांची जबाबदारी निश्चित करुन त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा, तसेच स्मार्ट सिटी शहरात सगळे होर्डिंग्ज देखील हटवण्यात यावेत, अशीही मागणी काटे यांनी केली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button