breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘फॉरेस्ट गंप’ फेम अभिनेता टॉम हँक्सने डोनेट केला प्लाझ्मा

ऑस्कर विजेते अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन हे कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे बरे झाले आहेत. इतकेच नाही तर दोघांनी प्रकृती सुधारताच टीव्हीवर कमबॅकही केले आहे. टॉम यांनी बुधवारी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरला जाणारा प्लाझ्मा दान केला आहे. अभिनेत्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी आपल्या प्लाझ्माचा फोटोही शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B_kpLiipcO1/?utm_source=ig_embed

टॉम यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लिहिले- ‘गेल्या आठवड्यातील प्लाझ्मा बॅग, कागदपत्रांच्या सोपस्कारांनंतर हे झोप घेण्याइतकचे सोपे होते’. टॉम आणि रीटा यांचा कोरोना रिपोर्ट मार्चमध्ये पॉझिटिव्ह आला होता. एल्व्हिस प्रिस्लेच्या बायोपिकच्या शूटिंगसाठी टॉम ऑस्ट्रेलियात पोहोचले होते. या जोडप्याने सोशल मीडियावरच त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. यानंतर, क्वारंटाईनमध्ये राहिलेले हे कपल आपल्या अधिकृत हँडल्सवर हेल्थ अपडेट देत राहिले. 1994 च्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटात टॉम यांनी मुख्य भूमिका साकारली होती. टॉम यांच्या या चित्रपटाचा अभिनेता आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ या नावाने हिंदी रिमेक बनवित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button