breaking-newsटेक -तंत्र

फेसबुक धोकादायक मजकूर ठळकपणे आधोरेखित करणार!

प्रचंड आकर्षक आणि वृत्तमूल्य असलेला पण सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक असलेल्या राजकीय-सामाजिक मजकुराला यापुढे धोकादायक म्हणून आधोरेखित केलं जाईल, असं फेसबुकनं स्पष्ट केलं आहे. जवळपास 90 हून अधिक कंपन्यांनी फेसबुकवर जाहिराती देण्यास नकार दिल्यानंतर कंपनीनं अधिक सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकवरील मजकूर मर्यादा ओलांडणारा किंवा भडक नसावा यासाठी समाजातून कंपनीवर मोठा दबाव आहे. विशेष म्हणजे यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांच्या फेसबुक पोस्टवरही गंभीर आक्षेप आहेत.

सध्या अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरणाचा काळ असल्याचं म्हणत युनिलिव्हरनंही फेसबुकवरील जाहिराती बंद केल्यात. तर डव्ह साबण आणि जेरीस आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीनं 2020 या पूर्ण वर्षात फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर जाहिरात देणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सध्याच्या काळात फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या कंपन्यांना जाहिराती देणं लोकांच्या आयुष्यात आणि समाजासाठी हितकारक नसल्याचं कंपनीनं म्हटलंय. जर गरज पडली तर आम्ही या निर्णयाचा पुनर्विचार करु असंही त्यांनी सुचवलंय. दरम्यान शुक्रवारी आपल्या भाषणात फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी हेट स्पीचविरोधात कंपनीनं वेळोवेळी पावलं उचलल्याचं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी युरोपियन कमिशनच्या रिपोर्टचा हवाला दिलाय. ज्यात गेल्या वर्षी फेसबुकनं 86 टक्के हेट स्पीच आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकल्याचं म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button