breaking-newsक्रिडा

फेडरर, नदाल, जोकोव्हिच विजेतेपदाचे दावेदार

टेनिस क्रीडा प्रकारातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेची मुख्य फेरी सोमवारपासून सुरू होणार आहे. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच या तीन नामांकित खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा असतील.

गतवर्षी सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. मात्र त्याला सर्वाधिक आठ वेळा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवणाऱ्या दुसऱ्या मानांकित फेडररकडून कडवी झुंज मिळेल. त्याशिवाय फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या नदालला सलग दुसरे ग्रँडस्लॅम पटकावण्याची संधी आहे.

महिला एकेरीत नुकताच फ्रेंच स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेली अ‍ॅश्ले बर्टी, गतविजेती अँजेलिक कर्बर, अनुभवी सेरेना विल्यम्स आणि जपानची नाओमी ओसाका यांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

भारताची मदार प्रज्ञेशवर

पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनवर भारतीय चाहते लक्ष ठेवून असतील. पुरुष दुहेरीत भारताचे लिएण्डर पेस, दिविज शरण आणि रोहन बोपण्णा आपापल्या साथीदारांसह खेळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button