breaking-newsमुंबई

फू बाई फू’ फेम अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन

मुंबई – फू बाई फू’फेम अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संतोष आजारी होते. आज (मंगळवारी) संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

नाटाकांसह संतोष यांनी मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली होती. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात त्यांनी आपल्या धमाल विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २००६ मध्ये देवाशपथ खोटे सांगेन या मराठी चित्रपटाद्वारे संतोषने मराठी चित्रपटामंध्ये पदार्पण केले होते.

विविध मालिका आणि नाटकांमध्येही त्यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. ‘भैय्या हातपाय पसरी’ , वस्त्रहरण, दोन बायका चावट ऐका आदी नाटक, मालिकेत त्यांनी काम केले. पण ‘भैय्या हातपाय पसरी’ या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. अर्थ, दशक्रिया, इंडियन प्रेमाचा लफडा, एक तारा, गलगले निघाले, सातबारा कसा बदलला, सत्या सावित्री आणि सत्यवान सारख्या चित्रपटांमधून संतोष यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button