breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोल दराची 2018 या वर्षातली नीचांकी नोंद

डिसेंबर महिना संपत आला आहे. नव्या वर्षात इंधनदरांमध्ये कपात होईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र 2018 चा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये वर्षाच्या अखेरीस कपात झालेली पाहावयास मिळते आहे. पेट्रोलच्या प्रति लिटर दराने नीचांकी दराची नोंद केली आहे. तर डिझेलने मार्चनंतचा नीचांकी दर नोंदवला आहे. मंगळवारी पेट्रोलचा दर 75 रुपये 41 पैसे प्रति लिटर असा होता. तर डिझेलचा दर 66 रुपये 79 पैसे असा होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सहा टक्के घसरण झाली. ज्यामुळे इंधनदरांमध्ये कपात झाली. पेट्रोल 21 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 19 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले. तर मंगळवारी पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे सात पैशांची कपात झाली, तर डिझेलचे दर जैसे थेच राहिले. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता कच्च्या इंधन दराचा दर गेल्या वर्षभरातील नीचांकी दर ठरला. क्रूड ऑइलचा दर प्रति बॅरल 42.53 अमेरिकी डॉलर्स इतका घसरलेला बघायला मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button