breaking-newsपुणे
पुणे-दिल्ली विमान रद्द केल्याने प्रवाशांचे हाल
पुणे – लोहगाव विमानतळावरून पुणे-दिल्लीकडे जाणारे विमान मंगळवारी रात्री ११.३० वाजता रद्द करण्याची घोषणा एअर इंडियाने केली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.
पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाची निर्धारित वेळ रात्री १० वाजता होती. मात्र, काही कारणास्तव विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली. त्यासाठी प्रवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला.
दरम्यान रात्री साडे अकरा वाजता पुणे – दिल्ली विमानाचे उड्डाण रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवशांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, विदेशी प्रवाशांना विमान रद्द केल्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागला.