breaking-newsपुणेमहाराष्ट्र

फूल बाजाराला मोठी बहर

  • साडेतीन लाख किलो झेंडूची आवक;  किलोस ५० ते ७० रुपये भाव

दसऱ्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फूल बाजारात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची सोमवारी मोठी आवक झाली. संपूर्ण राज्यातून फूल बाजारात झेंडू विक्रीसाठी पाठविण्यात आला असून बाजारात ३ लाख ४३ हजार ६२६ किलो एवढी झेंडूची आवक झाली. पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात सोमवारी एक किलो झेंडूची विक्री प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये किलो या दराने करण्यात येत होती.

दसऱ्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून घाऊक फूल बाजारात झेंडूची मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू झाली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी झेंडूची दुपटी, तिपटीने आवक झाली. पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर झेंडूची तोड करून बाजारात झेंडू विक्रीसाठी पाठविला. गेल्यावर्षीच्या तुलनेत झेंडूला कमी दर मिळाले. गेल्यावर्षी किरकोळ बाजारात झेंडूची विक्री ८० ते १०० रुपये किलो दराने झाली.

दरम्यान, मार्केटयार्डातील फूलबाजारात पहाटेपासून मोठय़ा प्रमाणावर  फुलांची आवक सुरू झाली. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूला ३० रुपये किलो असा दर मिळाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत झेंडूला यंदा कमी दर मिळाले. घाऊक बाजारात झेंडू ३ लाख ४२ हजार ६२६ किलो, गुलछडी ७ टन, पांढरी शेवंती २३ ते २४ टन, पिवळी शेवंती ४  टन अशी आवक झाल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली.

घाऊक बाजारातील फुलांचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू-३० ते ४० रुपये, गुलछडी- २०० रुपये किलो, पांढरी शेवंती-८० ते १८० रुपये, पिवळी शेवंती- ५० ते १५० रुपये

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button