breaking-newsमहाराष्ट्र

अभियंता शिवीगाळप्रकरणी नितेश राणेंना अटक, सहा जणांवर गुन्हा दाखल

कणकवली –  मुंबई-गोवा महामार्गावर अभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करणे, तसेच त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याप्रकरणी कणकवलीचे कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. आमदार राणे यांच्यासह सहा जणांवर पोलिसांनी भादंवि 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्येही आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत अरेरावी केली. दुसरीकडे, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई–गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्यांच्या अंगावर चिखल फेकला. नंतर अभियंता शेडेकर यांना खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कनकवली पोलिसांनी आमदार राणे यांना अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button