breaking-newsक्रिडा

फिफा विश्वचषक : लेवान्डोव्हस्की – मेन लढतीकडे सर्वांचे लक्ष

पोलंडची सेनेगलविरुद्ध परीक्षा 

मॉस्को – फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेतील आज (मंगळवार) रंगणाऱ्या एच गटातील लक्षवेधी लढतीत पोलंडसमोर सेनेगलच्या लढाऊ संघाचे कडवे आव्हान आहे. या लढतीत रॉबर्ट लेवान्डोव्हस्की आणि सादिओ मेन या युरोपियन फुटबॉलमधील दोन श्रेष्ठ आक्रमक खेळाडूंमधील झुंज फुटबॉलशौकिनांसाठी मेजवानीच ठरेल.

बायर्न म्युनिच संघाकडून खेळमाऱ्या लेवान्डोव्हस्कीने बंडस्लिगा स्पर्धेत सर्वाधिक 29 गोल करण्याचा मान सलग तिसऱ्या वर्षी मिळविला. त्याने गेल्या मोसमात सर्व स्पर्धांमध्ये मिळून 41 गोल केले आहेत. सादिओ मेनने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत 10 गोल नोंदवीत आपला दर्जा सिद्ध केला आहे. तसेच त्याने अंतिम सामन्यातही एक गोल केला होता. इजिप्तचा मोहमद सालाह आणि ब्राझिलचा रॉबर्टो फर्मिनो यांच्यासोबत तो लिव्हरपूलचा आधारस्तंभ गणला जातो.

केवळ दुसऱ्यांदा विश्‍वचषकासाठी पात्र ठरलेल्या सेनेगलला बाद फेरीत नेण्याची सादिओ मेनची क्षमता असल्याचा दावा सेनेगलच्या माजी खेळाडूंनी केला आहे. परंतु विश्‍वक्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या पोलंडला रोखण्यासाठी 27व्या स्थानावरील सेनेगलला बरीच प्रगती करावी लागेल. आठव्यांदा विश्‍वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या पोलंडची सर्वोत्तम कामगिरी 1974 आणि 1982 विश्‍वचषक स्पर्धेत तिसरे स्थान अशी आहे. या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी त्यांची मदार लेवान्डोव्हस्कीवर आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button