breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांच्या वाढदिनी वृक्षारोपण

कृपया प्रसिद्धीसाठी :

  • पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

पिंपरी : टाळगाव चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांच्या वाढदिवसानिमित विविध उपक्रम घेण्यात आले. पाटीलनगर चिखली येथील बैल गाडा घाट येथे वृक्षारोपण करण्यात आले. भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटनेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी भैरवनाथ महाराज बैलगाडा संघटनेचे सर्व सभासद चालक मालक शेतकरी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. वसुंधरा संवर्धनाचा संदेश केवळ पर्यावरण दिनी नाही, तर रोज आपल्या कृतीतून दिला पाहिजे. प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. निसर्गसंपन्न समाजातील नागरिक निश्चितपणे आरोग्यसंपन्न राहतील, यात शंका नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button