breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ता स्थापनेची अतिघाई, पुण्यात राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेसची फ्लेक्सबाजी !

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यात सरकार स्थापन करण्यात महायुतीचा मोठा भाऊ म्हणून भाजप अपयशी ठरल्याचे सिध्द होताच पुण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येणार असल्याचे फ्लेक्स झळकले आहेत.

या फ्लेक्सवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे फोटो झळकत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार Supriya Sule FC या फेसबुक पेजवर ही पोस्ट पहायला मिळत आहेत. यावरून बळीराजा संकटात असताना भाजप मात्र मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेला ताणून धरत असल्याचे त्यातून दाखविले जात आहे. पुण्यात काही ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लागले आहेत, असेही फोटोच्या वर नमूद केले आहे.

https://www.facebook.com/SupriyaSuleFC/photos/a.234079980333615/695358734205735/?type=3&theater

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button