breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फडणवीस राजीनामा, पिंपरीतील भावी मंत्र्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा, कलाटे समर्थकांत ‘गुदगुल्या’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या कंपून अत्यंत खुशीचे वातावरण दिसत आहे. सरकार स्थापन करण्याची आशा संपल्याने भाजपला एकाकी पाडावे लागले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्याची आशा सोडल्याचे सिध्द होताच शहरातील शिवसेनेचे वाकडचे नगरसेवक राहूल कलाटे यांच्या “ढाण्या वाघ… राहूल कलाटे समर्थक” फेसबुक ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. “फडणवीस यांचा राजीनामा, भावी मंत्र्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा.. आता कसं होणार?” असा मजकूर असलेली पोस्ट या फेसबुक पेजवरून व्हायरल होत आहे.

त्यामुळे मंत्री होण्याची स्वप्ने पाहणा-या पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे नेते कोण असा प्रश्न नागरिकांच्या मनात घोळथ आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना उद्देशून तर ही पोस्ट फिरवली नाही ना, असा तर्कवितर्क लावला जात आहे.

https://www.facebook.com/profile.php?id=100006990581525

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button