breaking-newsराष्ट्रिय

फक्त साडे आठ हजार रुपयांसाठी अक्षय कुमारने केला हा स्टंट

बॉलिवूडमधील खिलाडी म्हणून ओळखला जाणार अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमार नेहमी वेगवेगळे स्टंट करताना दिसत असतो. दरम्यान अक्षय कुमारने कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना देखील एक स्टंट केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या कुटुंबियांसोबत सुट्यांचा आनंद लुटत आहे. दरम्यान अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय एका दांडीला लटकलेला दिसत आहे. हा स्टंट करा आणि १०० पाऊंट्स (८,५४८ रुपये) घेऊन जा असे एक व्यक्ती व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. ‘फोर्ब्स’च्या यादीत येऊनही आनंदी नसलेला अक्षय एका झटक्यात १०० पाऊंट्स कमावण्यासाठी हा स्टंट करत आहे असे तिने हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.

‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीमध्ये खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूडमधील सर्वाधित कमाई करणारा अभिनेता ठरला आहे. दरम्यान, फोर्ब्सने शेअर केलेल्या यादीमध्ये अक्षयने रिहाना, जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या हाती सध्या ‘हाऊसफुल ४’, ‘मिशन मंगल’, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे बरेच चित्रपट आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button