breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक यांनी मराठी भाषेचा अभिमान जपणारा, आणि भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन आले आहे.ओटीटी या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्या पूर्णरूपी बदलली आहे. भारतात विविध निर्मितीगृहांनी व व्यावसायिकांनी ओटीटीचा क्षेत्रात झेप घेतली आहे. परंतु मराठी भाषेला जो दर्जा मिळायला हवा तो या ओटीटीवर मिळताना दिसत नाही. प्लॅनेट मराठी ओटीटी हे भारतातले पहिले असं माध्यम असणार आहे जे मराठी भाषेतील मनोरंजनास प्राधान्य देईल.

‘म मनाचा, म मराठीचा’ ही टॅगलाईन असणार आहे. मराठी कलेला प्राधान्य मिळावे व मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतिल मनोरंजन एका क्लिकवर उपलब्ध व्हावे हेच प्लॅनेट मराठी ओटीटीचे ध्येय असणार आहे . चित्रपट, नाटकं, सत्य घटनांवर आधारित व काल्पनिक कलाकृती, वेब सिरीज, डोक्युमेंटरी, या साऱ्यांची सांगड घालणारा हा एकमेव मराठी ओटीटी असणार आहे. मनोरंजनच नव्हे तर पाककला, व्यायाम, लहान मुलांचे माहितीपर कार्यक्रम हे सारेच या ओटीटीवर उपलब्ध असणार आहे. अँड्रॉइड व आयओएस धारकांसाठी मनोरंजनाची नवी परिभाषा आखणाऱ्या या ओटीटी ने प्रत्येक मराठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काहीतरी खास प्रयोजन केलेले आहे तेही अगदी माफक अश्या दरात. आता खऱ्या अर्थाने मराठी भाषेतील मनोरंजनाला मानाचे स्थान मिळणार आहे असे म्हणायला हरकत नाही.

प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. चे सीएमडी व मराठी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीविषयी म्हटलं आहे की “मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील”.

प्लॅनेट मराठी बाबत बोलताना अभिनेता पुष्कर श्रोत्री यानं म्हटलं की, “प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळाबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहत आहे”. पुष्कर सेलर प्लॅनेट मराठी सर्व्हिसेस प्रा. लि. चे सीईओ देखील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button