breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रेरणेतून सामाजिक काम वाढते – डॉ. मुगावे

  • गुणवंत पत्रकार, आदर्श शिक्षक व आदर्श महिला पुरस्काराचे वितरण
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सर्वांनी एकत्रित येत एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यातून कार्याला उर्जा मिळते आणि मोठे सामाजिक काम उभे राहते, असे मत ससून रुग्णालयाचे समासेवा अधिक्षक डॉ. शंकर मुगावे यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील चैतन्य सभागृहात काव्यमित्र संस्थेचा 19 वा वर्धापन दिन, सावित्रीबाई फुले जयंती, बाळशास्त्री जांभेकर जयंती, स्वामी विवेकानंद जयंती आणि जिजाऊ जयंती  साजरी करण्यात आली. तसेच, कवयत्री मनीषा भालके यांच्या मायेचा ओलावा या काव्यासंग्रहाचे प्रकाशन व गुणवंत पत्रकार, आदर्श शिक्षिका, आदर्श महिला आणि युवा चेतना पुरस्कार वितरण समारंभ आणि कवी संमेलन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. तसेच, कवयत्री मनीषा भालके यांच्या मायेचा ओलावा या काव्यासंग्रहाचे प्रकाशन यावेली झाले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक नंदकुमार वाळुंज, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ रश्मीकुमार अबरोल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्धन साळवे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर आदी उपस्थित होते.
शीला आठवले, सविता दुधभाते, आशा काळे, करुणा भुज यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, अमोल काकडे, योगिता साळवी, अक्षता अडसुळे, विजय सोनवणे यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार, ज्योति गरुड, पुष्पलता देसाई, माधुरी चौधरी यांना आदर्श महिला, सिध्दार्थ कंक, नरहरी गरुड, अॅड. शरद गुंड, बाबा हमीद जाफरी, इंद्रजित खेमनर, डॉ. शिवाजी भारती, राजेश दिवटे, राजेश बंडगर यांना युवा चेतना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नारायण काळबोंडे यांनी प्रास्ताविक केले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. तर आकाश लोंढे यांनी आभार मानले
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button