breaking-newsमहाराष्ट्र

प्री वेडिंग शूटवरुन वाद, श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची पोलीस निरीक्षकालाच मारहाण

श्रीवर्धन समुद्रकिनारी प्री वेडिंग शूटसाठी आलेल्या ११ पर्यटकांनी पोलीस निरीक्षकालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.

पर्यटकांसाठी श्रीवर्धनमधील समुद्रकिनारा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. या समुद्रकिनारी फोटोशूटसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय असते. मंगळवारी पुणे आणि औरंगाबाद येथील दोन कुटुंब प्री वेडिंग शूटसाठी श्रीवर्धन समुद्रकिनारी आले होते. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर हे पेट्रोलिंगसाठी समुद्रकिनारी आले. त्यांनी व जीपचालकाने दोन्ही कुटुंबीयांची चौकशी केली. या प्रकाराने दोन्ही कुटुंबातील सदस्य चिडले. त्यांनी खेडेकर यांच्याशी हुज्जत घातली. हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. खेडेकर यांना मारहाण करण्यापर्यंत या पर्यटकांनी मजल गाठली. या मारहाणीत खेडेकर यांच्या डाव्यात हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीनंतर पोलिसांनी महिला व पुरुष अशा एकूण ११ पर्यटकांना अटक केली आहे. तर दोन जण फरार आहेत.

दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहे. सीआयडीच्या २०१६ च्या गुन्हे अहवालानुसार, २०१५ मध्ये एकूण ३७० पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आले होते. तर, २०१६ मध्ये ४२८ पोलिसांवर हल्ले करण्यात आले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि कोल्हापूर या नऊ पोलीस आयुक्तालयांतर्गत १६३ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारांकडून हल्ले करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button