breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; अजित पवार म्हणाले..

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहिसरमध्ये हा थरार घडला असून या थराराचे लाईव्ह फुटेज हल्लेखोर मॉरिसच्या फेसबुक लाईव्हमुळे समोर आले आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. दहिसर गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे, अशी घटना कुठल्याही देशात, राज्यात वा शहरात घडू नये. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिषेक आणि मॉरीस यांच्यात चांगला संवाद दिसतो. त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध दिसत होते. व्हिडिओ पाहिल्यावर मॉरीस गोळीबार करणार असे वाटत नाही. परंतु आरोपीच्या चेहऱ्यावर एक तर मनात वेगळे असा हा प्रकार आहे. आता या घटनेचा नीट तपास व्हायला हवा. या हत्येमागील खरं कारण समोर आले पाहिजे. आता विरोधक बिहारचे उदाहरण देणार पण मुंबईतील दोन्ही गोळीबाराच्या घटना जर बघितल्या तर वेगळ्या आहेत. पिस्तूल देताना सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत, असं ते म्हणाले.

हेही वाचा     –    ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू

मी नेहमी सांगतो गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मला भेटवू नका. परंतु परवा मला भेटायला आलेला गुंड हा ओळखीच्या व्यक्तीसोबत आला होता. एक पत्रकार मला भेटायला आला, त्याच्यासोबत तो आला होता. त्याला नंतर मी फोन केला. तेव्हा त्याने चूक कबूल केली. पण या प्रकरणात माझी बदनामी झाली, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवार सद्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विमानतळाची पाहणी करण्यासाठी आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button