breaking-newsमनोरंजन

प्रियांकाच्या साखरपुड्यावेळी आलिया झाली भावुक

साधारण वर्षभरापासून देसी गर्ल आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा बहुचर्चित ठरलेला साखरपुडा अखेर पार पडला. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रियांकाच्या आयुष्यातील या खास दिवशी तिला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री आलिया भटही उपस्थित होती. मात्र या कार्यक्रमामध्ये ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

प्रियांका आणि निकने सहजीवनातील एक महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर त्यांनी मित्रपरिवारासाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये परिणीती चोपडा आणि आलिया भट या दोघीही आल्या होत्या.

दरम्यान, पार्टीमध्ये उपस्थित राहण्यासाठी येत असलेल्या आलियाच्या डोळ्यामध्ये पाणी तरळल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर गाडीमध्येही तिचे डोळे पाणावले होते. त्यामुळे नक्की आलियाच्या डोळ्यात पाणी का आलं हे स्पष्ट झालं नसलं तरी प्रियांका लवकरच विदेशी सून होणार असल्यामुळे आलिया भावूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या आलिया तिच्या आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून याव्यतिरिक्त ती ‘कलंक’, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. ‘राजी’ या चित्रपटामध्ये केलेल्या दमदार अभिनयामुळे सध्या आलिय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अग्रस्थानावर असल्याचंही पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button