breaking-newsमनोरंजन
श्रीदेवी यांच्या ऑनस्क्रीन बहिणीचं निधन
‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सुजाता कुमार यांचं रविवारी रात्री निधन झालं. सुजाता यांना मेटास्टेटिक कॅन्सर झाला होता. दिग्दर्शक शेखर कपूर आणि सुजाता यांची बहीण सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी फेसबुकच्या माध्यमातून सुजाता यांच्या निधनाची माहिती दिली.
सुजाता यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला असून सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी दिली.