breaking-newsमनोरंजन

जेव्हा वरुण वडीलांसाठी टेलर होतो

स्टुडंट ऑफ दि इअर’ या चित्रपटातून चंदेरी दुनियेत पदार्पण केलेल्या वरुण धवनचं नाव सर्वाधिक लोकप्रिय होणाऱ्या कलाकारांच्या यादीत घेतलं जातं. वरुण ज्याप्रमाणे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्याप्रमाणेच तो घरीदेखील साऱ्यांचा लाडका असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे घरातल्यांना भंडावून सोडणाऱ्या वरुणने यावेळी साऱ्यांच्या आठवणीत राहिलं अशी गोष्ट केली आहे.

चित्रपट दिग्दर्शक असलेले डेव्हिड धवन हे कायमच त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत असतात. मात्र त्यांचा यंदाचा वाढदिवस वरुणमुळे खास झाल्याचं पाहायला मिळालं. वरुणने यावेळी स्वत:च्या हाताने शिवलेला शर्ट डेव्हिड यांना बर्थडे गिफ्ट म्हणून भेट केला. विशेष म्हणजे वरुणचं हे गिफ्ट पाहून उपस्थित साऱ्यांनाच त्याचं कौतुक आणि अभिमान वाटला.

‘सुई धागा’ या चित्रपटाच्या निमित्ताने वरुणला सेटवर बरंच काही शिकायला मिळालं. चित्रिकरणादरम्यान वरुणला शिवणकाम देखील शिकता आलं. त्यामुळेच वडीलांचा यंदाचा वाढदिवस खास व्हावासाठी त्याने स्वत: शिवलेला शर्ट भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि घेतलेला निर्णय पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने चक्क शर्ट शिवला.

दरम्यान, शर्ट शिवल्यानंतर वरुणने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. ‘वडीलांसाठी खास भेट म्हणून हा शर्ट शिवला आहे’. असं त्याने या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे ‘सुई धागा’ या चित्रपटाने वरुणला बरंच काही शिकवल्याचं पाहायला मिळत आहे. वरुण आणि अनुष्का यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुई धागा’ हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button