breaking-newsपुणे

प्रा. अश्विनी संकेत पाटील यांना नांदेड विद्यापीठाच्या सुवर्णपदकाने गौरव

सांगली –  सांगली येथील आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्रा.अश्विनी संकेत पाटील यांना नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
बेंगलूर येथील भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था (इस्त्रो)चे माजी अध्यक्षपद्मविभूषण डॅा.के.कस्तुरीरंगन यांच्या शुभहस्ते व विद्यापीठाचे उपकुलपती डॉ.उध्दव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या दिक्षांत समारंभात अश्वीनी पाटील यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. नांदेड विद्यापीठाच्या सन.२०१८मध्ये घेण्यात आलेल्या एम फार्म -या पदव्युतर परिक्षेत लातूर येथील चन्ना बसवेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीच्या आश्विनी संकेत पाटील यानी सर्वाधिक ९५.३०टकके इतके गुणसंपादन करून विद्यापीठात सर्वप्रथम येवून रामानंद तीर्थ विधापीठाच्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या होत्या.
प्रा.अश्वीनी पाटील यांचे गांव कौलगे (ता.तासगांव जि.सांगली )असून सध्या त्या सांगली येथील आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.माजी कृषी अधिकारी आर.एन.पाटील यांच्या स्नुषा तर आर.एन.अॅग्रो प्रॉडक्टसचे कार्यकारी संचालक संकेत पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबददल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button